रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; आर अश्विननं सांगितलं असं काही…

चेन्नईत झालेल्या कसोटीत अश्विननं शतक झळकावलं. चेन्नईच्या या कसोटीसाठीच्या खेळपट्टीवरून कर्णधार जो रूटसह इंग्लंड संघानं नाराजी व्यक्ती केली होती. त्याच खेळपट्टीवर अश्विननं शतक झळकावून सडेतोड उत्तर दिले.

    टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनने ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर अश्विननं दुखापतग्रस्त असूनही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली. त्याचं आजही सारे कौतुक करत आहेत. हनुमा विहारी आणि अश्विननं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दमवलं होतं.

    चेन्नईत झालेल्या कसोटीत अश्विननं शतक झळकावलं. चेन्नईच्या या कसोटीसाठीच्या खेळपट्टीवरून कर्णधार जो रूटसह इंग्लंड संघानं नाराजी व्यक्ती केली होती. त्याच खेळपट्टीवर अश्विननं शतक झळकावून सडेतोड उत्तर दिले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांचे DRS कॉल चुकलेले पाहायला मिळाले आणि त्याचा टीम इंडियाला फटकाही बसला.

    यापूर्वी DRS कॉल कधी चुकले नव्हते, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत काही निर्णय चुकले, हे अश्विननं मान्य केलं. DRSच्या बाबात लोकांनी माझ्याबद्दल एक मत बनवलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी DRS चे निर्णय चुकलेले नव्हते. DRS घेताना आपण यष्टिरक्षकावर अवलंबून असतो. असं अश्विननं सांगितलं.

    याबाबत पुढे म्हणताना अश्विननं यष्टिरक्षक रिषभ पंतचे कान टोचले. रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले. मी त्याच्याशी याबाबत चर्चा केली. DRSचा निर्णय चुकल्यानं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही भडकले होते. असं अश्विन म्हणाला.