रोहित तुस्सी ग्रेट हो!; रोहित शर्माने सलग आठ वर्ष केला ‘हा’ विक्रम

वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. २०१३, २०१४ आणि २०१७ साली रोहितने वनडेमध्ये द्विशतकं झळकावली होती. २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध केलेली २६४ रनची खेळी आजही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधली सगळ्यात मोठी धावसंख्या आहे.

यंदा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या रोहित शर्माच्या(rohit sharma) नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. लागोपाठ ८ वर्ष रोहित शर्माच्या नावावर भारताच्या सर्वाधिक वनडे स्कोअरची नोंद आहे. यावर्षामध्ये भारत एकूण ९ वनडे मॅच खेळला. यातल्या ३ मॅच ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असताना, यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात ३ आणि आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ मॅच झाल्या. या ९ मॅचमध्ये भारताकडून तीन शतकं करण्यात आली. यातलं एक शतक रोहित शर्माने, एक केएल राहुलने आणि एक श्रेयस अय्यरने केलं.

२०२० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने १२८ बॉलमध्ये ११९ रनची खेळी केली होती. १९ जानेवारीला रोहितने बँगलोरमध्ये हे शतक केलं होतं. श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये १०७ बॉलमध्ये १०३ रनची खेळी केली होती. तर केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्धच तिसऱ्या वनडेमध्ये ११३ बॉलमध्ये ११२ रन केले होते. आयपीएल (IPL २०२०) वेळी रोहितच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. रोहित शर्मा हा सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये फिट होत आहे. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल

रोहितचा लागोपाठ ८ वर्ष भारतासाठी सर्वाधिक स्कोअर

२०१३ – २०९ (ऑस्ट्रेलियाविरुद्ध)

२०१४ – २६४ (श्रीलंकेविरुद्ध)

२०१५ – १५० (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध)

२०१६ – १७१* (ऑस्ट्रेलियाविरुद्ध)

२०१७ – २०८* (श्रीलंकेविरुद्ध)

२०१८ – १६२ (वेस्ट इंडिजविरुद्ध)

२०१९ – १५९ (वेस्ट इंडिजविरुद्ध)

२०२० – ११९ (ऑस्ट्रेलियाविरद्ध)

वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. २०१३, २०१४ आणि २०१७ साली रोहितने वनडेमध्ये द्विशतकं झळकावली होती. २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध केलेली २६४ रनची खेळी आजही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधली सगळ्यात मोठी धावसंख्या आहे.