चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विकेट वाचवण्यासाठी टीम इंडियाची नजर, सलमीवीर जोडी रोहित-राहुलची तुफानी खेळी

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विकेट वाचवण्यासाठी टीम इंडियाची नजर राहणार आहे. आतापर्यंत रोहित आणि राहुल यांच्यामध्ये ४३ धावांची भागेदारी झाली आहे. आज पहिल्या सत्रात ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. मालिकेच्या पहिल्या तिनही सामन्यांत या जोडीने शानदार प्रदर्शन केलं आहे. तसेच पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने विकेट गमावले नाहीतर सामना टीम इंडियाच्या पक्षात येऊ शकतो.

  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोेटी सामन्यांचा थरार सुरू आहे. यामध्ये आता चौथी कसोटी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येत आहे. चौथ्या कसोटी सामन्यांचे दोन दिवसीय सामने पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या दिवसीय खेळातील टीम इंडियाची धावसंख्या कोणतेही नुकसान न करता ४३ झाली. रोहित शर्मा २० तर आणि के.एल. राहुल २२ वर नाबाद राहीले आहेत. टीम इंडिया इंग्लंडपासून अवघ्या ५६ धावांनी मागे आहे.

  संभाळून करावी लागणार सुरूवात

  चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विकेट वाचवण्यासाठी टीम इंडियाची नजर राहणार आहे. आतापर्यंत रोहित आणि राहुल यांच्यामध्ये ४३ धावांची भागेदारी झाली आहे. आज पहिल्या सत्रात ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. मालिकेच्या पहिल्या तिनही सामन्यांत या जोडीने शानदार प्रदर्शन केलं आहे. तसेच पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने विकेट गमावले नाहीतर सामना टीम इंडियाच्या पक्षात येऊ शकतो.

  इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये बनवले २९० धावा

  याआधी इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये २९० धावा बनवल्या आहेत. तर एका वेळी टीमने ६२ धावांवर पाच विकेट गमावले होते. परंतु यानंतर ओली पोप ८१ आणि क्रिस वोक्सने ५० अशा धावा करत टीमला २९० पर्यंत पोहोचवले आहेत. पुढच्या पाच विकेटसाठी इंग्लंड टीमने २२८ धावा जोडत ९९ धावांची संख्या वाढवली. टीम इंडियासाठी उमेश यादवने खात्यामध्ये सर्वाधिक विकेट घेत ३ गडी बाद केले.

  टीम इंडियाने बनवल्या १९१ धावा

  टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करत टीम इंडियाने निशाजनक कामगिरी केली आहे. टीम फक्त १९१ धावा बनवू शकली. कर्णधार विराट कोहली ५० आणि शार्दूल ठाकुरने ५७ पर्यंत धावसंख्या बनवून सुद्धा चांगलं प्रदर्शन करू शकले नाही. टीममध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केले नव्हती.

  असे असतील दोन्ही संघ

  टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर अश्विन.

  इंग्लंड : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, हासीब हमीद, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, ओली पोप, सॅम करण, मोईन अली, जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, क्रेग ओवर्टन.