टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यातील शेवटच्या टी-२० सामन्याचं नेतृत्व रोहित शर्माकडे ?

चौथ्या टी-२० सामन्यामध्ये शेवटच्या ४ ओव्हरदरम्यान फील्डिंग करत असताना विराटला अचानक दुखापत झाली. त्यामुळे त्यानं मैदान सोडलं आणि कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्माकडे आली होती. परंतु आज टी-२० मालिकेचा पाचवा सामना असून कर्णधार विराट कोहली अद्याप फीट झाला की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तर विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अनेक शंका उपस्थित केल्य़ा आहेत.

    अहमदाबाद : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज (शनिवार) खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. परंतु चौथ्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने चार ओव्हर्ससाठी टीम इंडियाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांना उत्कृष्ट मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला होता.

    चौथ्या टी-२० सामन्यामध्ये शेवटच्या ४ ओव्हरदरम्यान फील्डिंग करत असताना विराटला अचानक दुखापत झाली. त्यामुळे त्यानं मैदान सोडलं आणि कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्माकडे आली होती. परंतु आज टी-२० मालिकेचा पाचवा सामना असून कर्णधार विराट कोहली अद्याप फीट झाला की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तर विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अनेक शंका उपस्थित केल्य़ा आहेत.

    कोहली पूर्णपणे निर्णायक सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, तो पूर्णपणे फिट नसल्यास ही जबाबदारी रोहित शर्माकडे देणार असल्याचं सांगितलं जात आहे.