रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी सज्ज, फिटनेस टेस्ट क्लिअर झाल्याने भारतीय संघात परतणार

हितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट (Cricket) अकादमीत फिटनेस चाचणी( Fitness Test) दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता रोहित शर्मा लवकरच भारतीय संघात (India) परतेल अशी अपेक्षा आहे.

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) फिट असल्याचं बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांकडून कळलं आहे. रोहितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट (Cricket) अकादमीत फिटनेस चाचणी( Fitness Test) दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता रोहित शर्मा लवकरच भारतीय संघात (India) परतेल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा आज सकाळी एनसीएमध्ये फिटनेस टेस्टमधून बाहेर पडला.शनिवारी, १२ तारखेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी (Australia) रवाना होईल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहील.

ऑक्टोबर महिन्यात आयपीएल (IPL) दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर तो फिटनेस चाचणीत पास झाला आहे.

दरम्यान, एनसीएचे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असणार आहे.