रोहितला टी-२० विश्वचषकाआधी संघाचं कर्णधारपद मिळायला हवं : पार्थिव पटेल

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजेतेपद मिळवून दिल्यापासून भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवावं अशी मागणी सोशल मीडियावर (Social Media)  होताना दिसत आहे. दरम्यान, रोहितला टी-२० विश्वचषकाआधी संघाचं कर्णधारपद मिळायला हवं, असं भाष्य भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने ( Parthiv Patel) केलं आहे.

आयपीएलच्या (IPL ) तेराव्या हंगामात भारताचा सलामीवर आणि ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) चांगली कामगिरी केली होती. तसेच मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजेतेपद मिळवून दिल्यापासून भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवावं अशी मागणी सोशल मीडियावर (Social Media)  होताना दिसत आहे. दरम्यान, रोहितला टी-२० विश्वचषकाआधी संघाचं कर्णधारपद मिळायला हवं, असं भाष्य भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने ( Parthiv Patel) केलं आहे.

काय म्हणाला पार्थिव पटेल ?

एक संघ कसा घडवायचा असतो हे रोहित शर्माने आपल्याला दाखवून दिलं आहे. स्पर्धा कशी जिंकायची हे त्याने दाखवून दिलं आहे. रोहितने आयपीएल आणि काही स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे दडपणाखाली तो कसा निर्णय घेतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ स्थिरावलेला नसतो, परंतू रोहितने अशा खेळाडूंसोबतही स्पर्धा कशी जिंकायची हे दाखवून दिलंय. जर रोहित शर्मा फिट असेल तर टी-२० विश्वचषकाआधी त्याला कर्णधारपद मिळायला हवं. असं पार्थिव पटेल म्हणाला.

९ डिसेंबरला सकाळी सोशल मीडियावरुन पार्थिवने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ३५ वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत २५ कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं १९४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे.