ख्रिस्तियानो रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो  याने एक जबरदस्त कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही नवीन कार जगातील सर्वात महागडी कार असल्याचं म्हटलं जात आहे. या कारचं नाव बुगाती सेंटोडिएसी (Bugatti Centodieci) असं आहे. रोनाल्डोने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तसेच रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या कारसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

You choose the view

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

मिळालेल्या माहितीनुसार, रोनाल्डोने घेतलेली ही नवीन कार जगातील सर्वात महागडी कार असून या कारची किंमत जवळपास ७५  कोटी रुपये इतकी आहे. तसेच ही कार अतिशय मर्यादित संख्येत उपलब्ध आहे.

दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या उत्तम कारगिरीमुळे युव्हेंटसला सलग नवव्यांदा सिरी-एचं विजेतेपद मिळालं. कोरोनानंतर युरोपमधील पाच प्रतिष्ठेच्या लीगमध्ये १० पेक्षा जास्त गोल पटकावणारा रोनाल्डो हा एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. तसेच सलग नवव्या वेळी सेरी-ए-लीग किताब जिंकल्यानंतर इटालियन क्लब जुवेंतसने त्याला शुभेच्छा दिल्या.