रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची हैदराबादवर १० धावांनी मात

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील आरसीबीने (RCB) पहिलाच सामना दणक्यात जिंकला. तसेच १० धावांनी हैदराबादवर (Hyderabad) मात केली आहे. आरसीबीने हैदराबादपुढे विजायासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवले नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि हैदराबाद (Royal Challengers Bangalore Vs Hyderabad)यांच्यात काल सोमवारी रात्री लढत झाली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील आरसीबीने (RCB) पहिलाच सामना दणक्यात जिंकला. तसेच १० धावांनी हैदराबादवर (Hyderabad) मात केली आहे. आरसीबीने हैदराबादपुढे विजायासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवले नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चहलने या सामन्यात १८ धावांत तीन बळी मिळवत आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हैदराबाद संघाचा कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर स्वस्तात गमावला. पण त्यानंतर जॉनी बेअरस्टोव्ह आणि मनीष पांडे यांनी हैदराबादच्या संघाच्या डावाला चांगला आकार देण्याचे काम केले. हैदराबादने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पण त्यांचा हा निर्णय आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पलीक्कडने चुकीचा असल्याचे दाखवून दिले. आपल्याच पहिल्याच सामन्यात देवदत्तने अर्धशतक झळकावत आपली निवड कशी योग्य आहे, हे दाखवून दिले.

जॉनी आणि मनीष यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. तसेच देवदत्तने पदार्पणाच्या सामन्यात ४२ चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर ५६ धावांची दमदार खेळी साकारली. त्याला दुसऱ्या टोकाकडून आरोन फिंचनेही चांगली साथ दिली.