रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय, सुपरओव्हरमध्ये केली मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात (Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians) काल सोमवारी सामना खेळवण्यात आला. यावेळी रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये (super-over) मात केली आहे.

दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात (Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians) काल सोमवारी सामना खेळवण्यात आला. यावेळी रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये (super-over) मात केली आहे. दोन्ही संघांमध्ये निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटला. ज्यानंतर सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर लावण्यात आला.

मुंबई इंडियन्सने RCB विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते.. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या.

सलामीवीर फिंच, पडीकल यांची अर्धशतकं आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर RCB ने मुंबईविरोधात २०१ धावांचा टप्पा गाठला. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच-पडीकल जोडीने आश्वासक सुरुवात करुन संघाची बाजू भक्कम केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी RCB च्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं.