राजस्थानकडून पंजाबचा दारूण पराभव, २० वर्षाच्या कार्तिक त्यागीने शेवटच्या ४ चेंडूवर घेतली पंजाबची फिरकी; नेमकं काय झालं?

राजस्थानने पंजाबचा दारूण पराभव (Punjab Lost The Match) कसा केला. याचं नेमकं कारण म्हणजे राजस्थानच्या २० वर्षाच्या युवा आणि वेगवान खेळाडू कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi)  शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबची फिरकी घेतली.

  IPL-2021च्या दुसऱ्या सत्रात काल मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स (RR VS PBKS) यांच्या सामन्यात राजस्थान टीमने बाजी मारली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये (Last Over) ४ धावांची गरज होती. परंतु पंजाबने फक्त १ धाव काढली आणि सामना २ धावांनी गमावला. राजस्थानने पंजाबचा दारूण पराभव (Punjab Lost The Match) कसा केला. याचं नेमकं कारण म्हणजे राजस्थानच्या २० वर्षाच्या युवा आणि वेगवान खेळाडू कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi)  शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबची फिरकी घेतली. त्यामुळे सामना हातातून सहज निघून गेला.

  शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

  शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला फक्त चार धावा काढायच्या होत्या. परंतु टीमकडे ८ विकेट बाकी होते. परंतु टीमसाठी अँडन मार्कराम आणि निकोलस पूरण बॅटिंग करत होते. शेवटची ओव्हर २० वर्षाचा युवा खेळाडू कार्तिक त्यागी करत होता.

  पहिल्या चेंडूवर – डॉट बॉल (अँडन मार्कराम एकही धाव घेऊ शकला नाही.)

  दुसऱ्या चेंडूवर – एक धाव संख्येची गरज होती.

  तिसऱ्या चेंडूवर – पूरणचा विकेट गेला आणि माघारी फिरला. त्यानंतर सामन्यात ट्विस्ट होऊन पंजाबला ३ चेंडूवर तीन धावांची गरज होती.

  चौथ्या चेंडूवर – डॉट बॉल ( सामना हातात आला होता आणि चौथा चेंडही डॉट होता)

  पाचव्या चेंडूवर – हुड्डाची विकेट (पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आणि शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती)

  सहाव्या चेंडूवर – डॉट बॉल

  दरम्यान, वरील सहा चेंडूंच्या थरारावर पंजाबच्या तोंडातला घास हिसकावला गेला आणि पंजाबला मोठा धक्का बसला.