रशियाचा फुटबॉलपटू मोस्तोवोय याला कोरोनाची लागण

यूरो कप २०२० या स्पर्धेवर करोनाचं सावट कायम आहे. स्पर्धेपूर्वी खेळाडूंची कोरोना पीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी फुटबॉलपटू अंद्रेय मोस्तोवोय याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

    स्पेन, नेदरलँड आणि स्वीडनच्या खेळाडूंना करोना झाल्यानंतर आता रशियाच्या खेळाडूला कोरोनाची लागण आहे. रशियाचा फुटबॉलपटू अंद्रेय मोस्तोवोय याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आहे. त्याच्याऐवजी रोमन येव्गेनेयव्ह याला संघात संधी देण्यात आली आहे.

    यूरो कप २०२० या स्पर्धेवर करोनाचं सावट कायम आहे. स्पर्धेपूर्वी खेळाडूंची कोरोना पीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी फुटबॉलपटू अंद्रेय मोस्तोवोय याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

    अंद्रेय मोस्तोवोय याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी डिफेन्डर रोमन येव्गेनेयव्हला संधी देण्यात आली आहे, असं रशियन संघाकडून सांगण्यात आलं आहे.