२२७ वेळा कोरोना टेस्ट करणं सचिन तेंडूलकरला पडलं महागात, टेस्ट करताना अचानक सचिन ओरडू लागला आणि…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत.

  नुकतीच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळेचा व्हिडिओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी सचिनची वर्तवणूक बघून मेडिकल स्टाफ मात्र चांगलाच घाबरला. कारण ही टेस्ट करताना जोरात ओरडला यामुळे मेडिकल स्टाफ घाबरला. सचिनने या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

   

  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत. मंगळवारी सचिनची इंग्लंड लीजंटस विरुद्ध सामना खेळण्यापूर्वी करोना टेस्ट केली गेली. या संदर्भातला व्हिडीओ सचिनने सामन्याच्या काही तास अगोदर पोस्ट केला आहे.

  काय आहे व्हिडिओत

  सचिन खुर्चीत बसलेला दिसतोय. त्याच्या नाकातून स्वॅब् घेतला जात आहे. सुरवातीला टेस्ट करणाऱ्या मेडिकल स्टाफ मध्ये सचिन ओरडल्याने थोडे घाबरले, पण सचिननेच मजा केल्याचा खुलासा केल्यावर सर्व जण हसले. सचिनने कॅप्शन लिहिताना वातावरण थोडे हलके व्हावे म्हणून मेडिकल स्टाफची थोडी मस्करी केल्याचे म्हटले आहे. २०० सामने खेळले आणि २२७ करोना टेस्ट केल्या. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम.