…असे म्हणत भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान  मोदींनी  केले कौतुक

भारताला पाच पैकी चार साखळी सामने जिंकण्यात यश आले होते. तसेच उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी ग्रेट ब्रिटनवर ३-१ अशी मात केली. बेल्जियमविरुद्ध मात्र भारताचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा केली.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुष हॉकी संघाला ( Indian men’s hockey) आज ( मंगळवारी) झालेल्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. बेल्जियमने भारताला ५-२ असे पराभूत केले. या पराजयामुळे त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न अधुरेच राहिले. भारताला पाच पैकी चार साखळी सामने जिंकण्यात यश आले होते. तसेच उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी ग्रेट ब्रिटनवर ३-१ अशी मात केली. बेल्जियमविरुद्ध मात्र भारताचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांची चर्चा केली.

    दमदार कामगिरीबद्दल कौतुक

    मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे कौतुक केले. तसेच कांस्यपदकासाठी गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याआधी मोदी यांनी ट्विट करतही भारतीय संघाला प्रोत्साहन दिले होते. ‘विजय आणि पराभव हे जीवनाचा भागच आहेत. आपल्या पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्वात महत्त्वाचे आहेत. पुढील सामन्यासाठी आणि भविष्यासाठी या संघाला खूप शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे,’ असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले.