सेरेना विल्यम्सची फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार, नक्की काय झालं?

२३ ग्रँडस्लॅम (Grand Slam) विजेत्या सेरेना विल्यम्स (Serena Williams) आज बुधवारी त्सेताना पिरोन्कोवाविरुद्ध दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार होती. परंतु तिने त्यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. तिने हा निर्णय टाचेच्या दुखापतीमुळे घेतला आहे. सेरेनाने सोमवारी फ्रेंच ओपनची पहिली फेरी जिंकली होती.

 पॅरिस : फ्रेंच ओपन २०२०च्या स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून सेरेनाकडे (Serena Williams) पाहिले जात होते. ती देखील कारकिर्दीतील २४ वे ग्रँडस्लॅम ( French Open Grand Slam tennis tournament) जिंकण्यास उत्सुक होती. परंतु युएस ओपन दरम्यान झालेल्या दुखापतीतून ती पूर्णपणे सावरली नसल्याने अखेर तिने फ्रेंच ओपनमधून माघार (withdraws) घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावेळी तिला चालतानाही त्रास होत असल्याचे सांगितले.

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्स आज बुधवारी त्सेताना पिरोन्कोवाविरुद्ध दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार होती. परंतु तिने त्यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. तिने हा निर्णय टाचेच्या दुखापतीमुळे घेतला आहे. सेरेनाने सोमवारी फ्रेंच ओपनची पहिली फेरी जिंकली होती. सेरेनाने आत्तापर्यंत ३ वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.