रिलेशनशीप आणि करिअर… घटस्फोटानंतर धवनच्या करिअरला मोठा धक्का..

शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर वेगवेगळे झाले आहेत. आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका घोषणा केलीये की, ही माहिती समजल्यानंतर धवनला एक मोठा धक्का बसला आहे. टी-20 वर्ल्डकप 2021 साठी टीम इंडियाने मोठी घोषणा केली होती, यामध्ये धवनच्या नावाचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे धवनला आता दोन धक्के बसले असून तो संकटांचा सामना करत आहे. 

    नवी दिल्ली: टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्याच्यावर जणू दुख:चा डोंगर कोसळला आहे. पहिल्यांदा त्याची पत्नी आयशा मुखर्जीसोबत धवनचा घटस्फोट झाला. त्यानंतर धवनला अजून एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे टी-20 वर्ल्डकपच्या संघामध्ये त्याला सहभागी केलं गेलेलं नाहीये. या गोष्टींवर धवनने एकही शब्द किंवा वक्तव्य केलेलं नाहीये. परंतु इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शिखरने आपली एक स्टोरी शेअर केली आहे.

    धवनच्या अडचणीत वाढ

    शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर वेगवेगळे झाले आहेत. आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका घोषणा केलीये की, ही माहिती समजल्यानंतर धवनला एक मोठा धक्का बसला आहे. टी-20 वर्ल्डकप 2021 साठी टीम इंडियाने मोठी घोषणा केली होती, यामध्ये धवनच्या नावाचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे धवनला आता दोन धक्के बसले असून तो संकटांचा सामना करत आहे.

    सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

    शिखर धवनने एका पोस्ट शेअर करत त्याने दोन्ही मुद्दयांवर काहीच भाष्य केलेलं नाहीये. त्याने फक्त इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये तो हसताना दिसत आहे. तसेच त्याने फोटोवर एक कॅप्शन दिलं आहे. हसत रहा कारण हीच तुमची मोठी ताकद आहे. अशा प्रकारचं कॅप्शन शिखरने पोस्टमध्ये लिहिलं आहे.