‘तू तर डबल ढोलकी’, सोशल मीडियावर शोएब अख्तर ट्रोल ; यामागील नेमकं काय आहे कारण ?

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमीच आपल्या टीमवर टीका करताना दिसतो. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा (England vs Pakistan) 3-0 ने पराभव झाला. या पराभवानंतर शोएबने पाकिस्तानच्या टीमवर सडकून टीका केली होती.

  जेव्हा पाकिस्तानचा पराभव होतो तेव्हा शोएब टीमच्या कमजोरी मांडण्यात अजिबात कसर ठेवत नाही, पण शनिवारी मात्र शोएबने पाकिस्तान टीमचं कौतुक केलं. पाकिस्तान बेस्ट टी-20 टीम असल्याचं शोएब म्हणाला, यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर दुतोंडी माणूस असल्याची टीका केली.

  पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमीच आपल्या टीमवर टीका करताना दिसतो. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा (England vs Pakistan) 3-0 ने पराभव झाला. या पराभवानंतर शोएबने पाकिस्तानच्या टीमवर सडकून टीका केली होती.

  View this post on Instagram

  A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

  पाकिस्तानच्या टीममध्ये कोणीही स्टार खेळाडू नाही. अशाच प्रकारे टीम खेळत राहिली, तर एक दिवस असा येईल जेव्हा देशात कोणीच क्रिकेट बघणार नाही, असं शोएब अख्तर म्हणाला होता.