धक्कादायक! कुस्तीपटू बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अ‍ॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.हा पराभव तिच्या जिव्हारी लागला होता.

    नवी दिल्ली : कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव जिव्हारी लागल्याने कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगट यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बबीता फोगाटच्या १७ वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असं आहे. ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले महाबीर पैलवानच्या यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अ‍ॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.हा पराभव तिच्या जिव्हारी लागला होता. यानंतर तिने १५ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगट यांच्या बलाली गावातील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. तिच्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पहिलवान रितिकाने १५ मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील एका खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.