पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्तुल मध्ये Singhraj Adhana ला कांस्य पदक जिंकले

३९ वर्षीय सिंहराज अधानाने १० मीटर एअर पिस्तूल SH1च्या अंतिम हे कांस्य पदक मिळवले आहे. चीनच्या यांग चाओ २३७. गुणांसह सुवर्ण पदक मिळवले आहे. या पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ५ पदके जिंकली आहेत.

    टोकियो: जपान येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये आज सातव्या दिवशी आज पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सिंहराज अधानाने(Singhraj Adhana) कांस्य पदक ( Bronze medal) जिंकले आहे. ३९ वर्षीय सिंहराज अधानाने १० मीटर एअर पिस्तूल SH1च्या अंतिम हे कांस्य पदक मिळवले आहे. चीनच्या यांग चाओ २३७. गुणांसह सुवर्ण पदक मिळवले आहे. या पॅरालिम्पिकमध्ये  याच स्पर्धेत पात्रता फेरीत अव्वल येत भारताचा मनीष नरवालही फायलनमध्ये आला होता. पण तो पदकापासून थोडक्यात हुकला आहे. तर स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदकं चीनच्या नेमबाजांनी मिळवली आहेत.

    भारताच्या खिशात ८ पदकं

    भारताने आतापर्यंत ७ पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे. आता सिंगराजच्या या विजयामुळे भारताकडे एक कांस्य पदक आणखी आले आहे. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण ८ पदकं झाली आहेत.