‘या’ दोन कारणांमुळे सोडले कर्णधारपद; अखेर विराटनेच स्वत: केला खुलासा

विराट कोहली(Virat Kohli ) यंदाच्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. शिवाय, तो आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाच्या कप्तानपदावरूनही हटणार आहे. विराटने हे निर्णय जाहीर करताना त्यामागील कारण मात्र सांगितले नव्हते. यावर भारतीय क्रिकेट वर्तुळासह चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. अखेर विराटने मौन सोडून या मागील कारणांचा खुलासा केला आहे. भारतीय टी-20 संघाचे आणि आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यामागे कामाचा भार हेच प्रमुख कारण असल्याचे विराटने स्पष्ट केले.

    दुबई : विराट कोहली(Virat Kohli ) यंदाच्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. शिवाय, तो आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाच्या कप्तानपदावरूनही हटणार आहे. विराटने हे निर्णय जाहीर करताना त्यामागील कारण मात्र सांगितले नव्हते. यावर भारतीय क्रिकेट वर्तुळासह चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. अखेर विराटने मौन सोडून या मागील कारणांचा खुलासा केला आहे. भारतीय टी-20 संघाचे आणि आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यामागे कामाचा भार हेच प्रमुख कारण असल्याचे विराटने स्पष्ट केले.

    एका मुलाखतीत विराटने यावर अतिशय स्पष्ट आणि मोजक्या शब्दांत भाष्य केले. दोन गोष्टी होत्या. सर्वात महत्त्वाचा घटक होता कामाचा ताण. मला माझ्या जबाबदाऱ्यांबाबत पूर्णपणे प्रामाणिक राहायचे आहे आणि मला माझे पूर्ण योगदान देता यावे, अशी माझी इच्छा आहे. कोणतेही काम करताना 120 टक्के योगदान दिले पाहिजे, असे मला वाटते.

    त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना मी माझे 120 टक्के देतो, असे विराट म्हणाला. मी त्या लोकांप्रमाणे नाही जे त्या जबाबदारी घेऊन बसतात, सोडायला तयार नसतात. मी कोणत्याच गोष्टींशी अशा प्रकारे जोडला गेलेलो नाही आणि याबद्दल माझ्या डोक्यात अतिशय स्पष्टता आहे, असे विराट म्हणाला.

    विराट 2014 पासून भारताच्या कसोटी संघाचा तर पासून मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला एकाही आयसीसी स्पर्धेत विजय नोंदवता आला नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी व 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तर, 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. तसेच, 2013 पासून तो आरसीबीचा कर्णधार असताना, संघाला एकही विजेतेपद मिळाले नाही.