जर्सी नंबर 18 की कमाल! स्मृती मंधानाचे ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक शतक, विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक

स्मृती मंधानाची ऐतिहासिक खेळी, भारतीय क्रिकेटला मिळाली 'Goddess of the offside' 25 वर्षाच्या मंधानाने टेस्ट करिअरमध्ये पहिले शतक झळकावले आहे. तिने डालातील 52 व्या षटकात एलिसा पेरीच्या बॉलवर आपले पहिले वहिले शतक ठोकले.

    नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) मध्ये होत असलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ने शानदार शतक ठोकले. तिने हे शतक 170 चेंडूत 18 चौकार आणि एक षटकार मारून केले. हे स्मृतीच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आहे. परंतु विराट कोहली (Virat Kohli) नंतर भारताकडून गुलाबी चेंडू कसोटीमध्ये शतक करणारी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुसरी क्रिकेटर ठरली आहे.

    स्मृती मंधानाची ऐतिहासिक खेळी, भारतीय क्रिकेटला मिळाली ‘Goddess of the offside’ 25 वर्षाच्या मंधानाने टेस्ट करिअरमध्ये पहिले शतक झळकावले आहे. तिने डालातील 52 व्या षटकात एलिसा पेरीच्या बॉलवर आपले पहिले वहिले शतक ठोकले.

    ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारी मंधाना पहली महिला क्रिकेटर बनली आहे. कोहलीने 2019 मध्ये कोलकाता कसोटीमध्ये बांगलादेशविरूद्ध 136 धावांची खेळी केली होती. मंधानाने शतक ठोकताच चाहत्यांनी सोशल मीडिया जर्सी नंबर-18 ची चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.