श्रीलंकेने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचे वन डे संघात पदार्पण

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथमच वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या युवा संघाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. टीम इंडियाचे नेतृत्व करणारा शिखर धवन हा २५वा खेळाडू आहे. वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावा करण्यासाठी त्याला २३ धावांची गरज आहे आणि हा पल्ला पार करणारा तो १०वा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

  श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महान फलंदाज राहुल द्रविडही प्रथमच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. भारताचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाठवले. आज पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पदार्पण केले आहे.

  शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथमच वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या युवा संघाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. टीम इंडियाचे नेतृत्व करणारा शिखर धवन हा २५वा खेळाडू आहे. वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावा करण्यासाठी त्याला २३ धावांची गरज आहे आणि हा पल्ला पार करणारा तो १०वा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

  इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत इशान व सुर्या यांनी एकत्रच ट्वेंटी-२० संघात पदार्पण केलं होतं अन् आज वन डे संघातही ही दोघं सोबतच पदार्पण करत आहेत.

  अशी असेल टीम इंडिया

  भारत संभाव्य प्लेईंग  इलेव्हन – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी

  श्रीलंका संभाव्य  प्लेईंग  इलेव्हन – पथुम निसंका, चरिथ असालंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, रमेश मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा.

  तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते ?, हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…