श्रीलंकेची दिलासादायक फलंदाजी, भारताला विजयासाठी २७६ धावांचे लक्ष्य

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी देखील घेतली. मालिकेती दुसऱ्या सामन्याला कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर सुरुवात झाली.

    भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी देखील घेतली. मालिकेती दुसऱ्या सामन्याला कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर सुरुवात झाली.

    सामन्यात श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी उत्कृष्ठ सुरुवात करत 77 धावांची भागिदारी रचली. त्याचवेळी 14 व्या ओव्हरसाठी मैदानात आलेल्या चहलने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर मिनोद आणि राजपक्षा यांना बाद करत भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या.