टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात, इंग्लंडनं टॉस जिंकला ; वेगवान गोलंदाजीसाठी टीम इंडिया तयार

टीम इंडियानं या टेस्टमध्ये दोन बदल केले असून जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवचा समावेश टीममध्ये करण्यात आला आहे. इंग्लंडच्या टीममध्येही एक बदल करण्यात आला असून स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी डॉम बेसचा समावेश करण्यात आला आहे.

    अहमदाबाद : टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. आज (गुरूवार) कसोटीचा शेवटचा सामना असून टीम इंडिया बाजी मारणार का, हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकला असून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. चार टेस्टच्या या मालिकेत सध्या टीम इंडियाकडं २-१ अशी आघाडी आहे. यापूर्वी याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium ) झालेली तिसरी टेस्ट भारतानं अवघ्या दोन दिवसांमध्ये जिंकली होती.

    टीम इंडियानं या टेस्टमध्ये दोन बदल केले असून जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवचा समावेश टीममध्ये करण्यात आला आहे. इंग्लंडच्या टीममध्येही एक बदल करण्यात आला असून स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी डॉम बेसचा समावेश करण्यात आला आहे.

    अशी असेल चौथ्या कसोटीत टीम इंडिया :

    विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, के. एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा , रविचंद्रन अश्विन (फिरकीपटू), कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.