Ind vs Aus (Live) : | विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण, टीम इंडियाच्या १३६ धावा | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट3 years ago

विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण, टीम इंडियाच्या १३६ धावा

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
15:21 PMDec 17, 2020

विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण, टीम इंडियाच्या १३६ धावा

भारतीय संघाच्या १३६ धावा झाल्या असून विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण झालं आहे. तर अजिंक्य रहाणेच्या १५ धावा पूर्ण झाल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे ६३ ओव्हर पूर्ण झाल्या आहेत.

भारताने १०७ धावांपर्यंत मजल मारली असून तीन गडी बाद झाले आहेत.रहाणे आणि कोहली यांच्यावर पुढील रणनीतीची जबाबदारी आहे. त्यामुळे भारतीय संघ किती धावांपर्यंत मजल मारणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

15:08 PMDec 17, 2020

विराट आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी फलंदाजीची धुरा सांभाळली

कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने अॅडलेड कसोटीत चहापानाच्या सत्रापर्यंत ३ बाद १०७ अशी मजल मारली आहे. पहिल्या सत्राअखेरीस २ बाद ४१ अशी परिस्थिती झालेल्या भारतीय संघाला विराट आणि पुजाराच्या अर्धशतकी भागीदारीमुळे आधार मिळाला.

१६० चेंडूंचा सामना करत २ चौकार लगावत पुजाराने ४३ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराला बाद करण्याची लियॉनची ही १० वी वेळ ठरली. पुजारा माघारी परतल्यानंतर विराट आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी फलंदाजीची धुरा सांभाळली आहे.

12:01 PMDec 17, 2020

Day 1, Session 1

11:45 AMDec 17, 2020

२५ ओव्हरनंतर भारतीय संघाचा स्कोर : ४१/२ चेतेश्वर पुजारा (१७) आणि विराट कोहली (५)

सामनाच्या पहिल्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलिया उत्तम कामगिरी करत भारतीय संघाचे दोन गडी बाद केले आहेत. २५ ओव्हरमध्ये भारतीय संघाने ४१ धावा काढल्या आहेत. पृथ्वी आणि मयांक अग्रवाल हे दोन गडी बाद झाल्यानंतर मैदानात कर्णधार विराट कोहली (५) आणि तिसऱ्या नंबरवर आलेल्या चेतेश्वर पुजाराने (१७) धावा केल्या आहेत.

२५ ओव्हरनंतर भारतीय संघाचा स्कोर : ४१/२ चेतेश्वर पुजारा (१७) आणि विराट कोहली (५).

11:25 AMDec 17, 2020

टीम इंडियाला दुसरा धक्का, मयांक अग्रवाल सुद्धा क्लीन बोल्ड

- टीम इंडियाच्या ३६ धावा पूर्ण झाल्या असून २३ ओव्हर पूर्ण झाल्या आहेत. परंतु टीम इंडियाने दोन विकेट्स गमावल्या आहेत.

- टीम इंडियाला दुसरा धक्का बसला असून मयांक अग्रवाल १७ धावा काढून बाद झाला आहे. यामध्ये मयांक क्लीन बोल्ड झाला आहे. मयांक नंतर पुढच्या सलामीला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे. विराट आणि पुजारा अशी जोडी मैदानात तैनात आहे.

- सलामीवीर पृथ्वी शॉची दांडी उडाल्यानंतर मयांक अग्रवालने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. दहाव्या ओव्हरमध्ये पहिला चौकार मयांक अग्रवालने लगावला. त्यानंतर १३ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या एकूण २५ धावा झाल्या. मयंक अग्रवाल (१०) आणि चेतेश्वर पुजारा (१४).

 

10:22 AMDec 17, 2020

मिचेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉची दांडी गुल, क्रिकेट प्रेमी संतापले

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्याला खराब सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने  प्रथम फलंदाजीची धुरा हाती घेतल्यानंतर भारताचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे मैदानात उतरले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉची दांडी उडाली असून तो शून्यावर माघारी परतला आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट प्रेमी त्याच्यावर संतापले असून मीम्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

क्रिकेट प्रेमींकडून मीम्सचा वर्षाव 

 

10:05 AMDec 17, 2020

भारत सामना जिंकणार…

कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. त्यावेळी भारतीय संघाने २१ वेळा सामने जिंकले असून ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India and Australia) यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला (Test matches) आज गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. दोन्ही संघामध्ये पहिल्यांदा नाणेफेक उडविण्यात आले. यामध्ये विराटने नाणेफेक जिंकली (Virat won the toss) असून कोहलीने प्रथम फलंदाजी (First Batting) करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० मालिकेनंतर (T-20 Test Series) कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ काय कमाल करणार ? याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने विशेष सुट्टी मंजूर केली आहे. तसेच भारताचा हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असून त्याला कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. परंतु रोहित पहिल्या दोन सामन्याला मुकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.