टोक्यो ऑलम्पिकवर कोरोनाचे वादळ, रशियापाठोपाठ जपानच्या ५ ऑलम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

टोक्यो ऑलम्पिक मागील वर्षी कोरोनाच्या (Corona) संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मागील वर्षी २१ जुलैपासून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती. आता यावर्षी सर्व उपाययोजना करुन जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने २३ जुलैपासून स्पर्धेचे आयोजन केले आहे

  टोक्यो : टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्यावर कोरोनाचे वादळ घोंघावत आहे. स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असून ब्राझील, रशियापाठोपाठ जपानच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  बऱ्याच देशातील संघाच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण होत आहे.

  टोक्यो ऑलम्पिक मागील वर्षी कोरोनाच्या (Corona) संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मागील वर्षी २१ जुलैपासून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती. आता यावर्षी सर्व उपाययोजना करुन जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने २३ जुलैपासून स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट स्पर्धेसमोर आवासून उभे आहे.

   जपानच्या ऑलम्पिक दलातील सहा जणांना कोरोनाची बाधा

  जपानच्या ऑलम्पिक दलातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सहा जणांमध्ये एक खेळा़डू असून काही कॉन्ट्रेक्टर आणि काही स्पर्धेच्या सपोर्ट स्टाफमधील व्यक्ती आहेत.

  रशिया आणि ब्राझीलच्या ऑलम्पिक दलातही कोरोनाची बाधा

  जपानच्या दलात कोरोनाचा शिरकाव होण्याआधी जपानचे ऑलम्पिक खेळांच्या व्यवस्थेसाठी असणाऱ्या हमामात्सु शहरातील एका हॉटेलच्या ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाने संबधित कोरोनाबाधित कर्मचारी कोणत्याच ब्राझीलच्या संघातील सदस्याच्या संपर्कात आले नसल्याचे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे रशियाच्या रग्बी संघातील एका खेळाडूला ही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

  तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते? हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…