आयपीएलचा डबल धमाका : पंजाब किंग्ससमोर आज दिल्ली कॅपिटल्सचं मजबूत आव्हान? के.एल.राहुलच्या बदल्यात ‘हा’ खेळाडू सांभाळणार टीमची धुरा

दिल्लीविरुद्धच्या (PBKS vs DC) मॅचमध्ये केएल राहुल (KL Rahul) याच्याऐवजी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) टॉससाठी मैदानात उतरला. पोटाच्या दुखापतीमुळे केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्याच्याऐवजी मयंक अग्रवालला पंजाबचं नेतृत्व देण्यात आलं आहे. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

    अहमदाबाद : आयपीएलच्या १४ व्या (IPL 2021) मोसमातील २९ वा सामना (Punjab Kings) पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील (narendra modi stadium) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

    दिल्लीविरुद्धच्या (PBKS vs DC) मॅचमध्ये केएल राहुल (KL Rahul) याच्याऐवजी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) टॉससाठी मैदानात उतरला. पोटाच्या दुखापतीमुळे केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्याच्याऐवजी मयंक अग्रवालला पंजाबचं नेतृत्व देण्यात आलं आहे. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
    या सामन्यात पंजाबने टीममध्ये दोन बदल केले, मागच्या सामन्यापर्यंत दुखापतग्रस्त असलेला मयंक अग्रवाल राहुलऐवजी टीममध्ये आला, तर फॉर्ममध्ये नसलेल्या निकोलस पूरनऐवजी (Nicholas Pooran) डेव्हिड मलानला (David Malan) संधी देण्यात आली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.