sumit antil

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये(Paralympics) सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक(Gold Medal To Sumit Antil) मिळवून दिलं आहे.

    टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये(Paralympics) सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक(Gold Medal To Sumit Antil) मिळवून दिलं आहे. या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते.

    पॅरालिम्पिकमध्ये भारताची चांगली कामगिरी सुरु आहे. सुमितच्या आधी भारताला नेमबाजीतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.

    सुमितच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटद्वारे कौतुक केले आहे. “आमचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये चमकत आहेत! पॅरालिम्पिकमधील सुमित अंतिलच्या विक्रमी कामगिरीचा राष्ट्राला अभिमान आहे. सुमितने प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुला भविष्यासाठी शुभेच्छा”, असे त्यांनी म्हटले आहे.