सुमित नागलचा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पहिला विजय साजरा

मंगळवारी मध्यरात्री अमेरिकन ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीचा पहिला अडथळा अगदी लीलया दूर केला. या सामन्यात २ तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१,६-३, ३-६,६-१ असे पराभूत केले.

अमेरिकन ओपन टेनिस( Us Open Tennis) स्पर्धेत पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लानला सुमित नागलने(Sumit Nagal) पराभूत करत गेल्या सात वर्षांमध्ये ग्रॅण्डस्लॅम (Grand Slam victory) स्पर्धेत एकेरीत सामन्यात विजय मिळवणारा पहिला भारतीय बनला आहे. मंगळवारी मध्यरात्री अमेरिकन ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीचा पहिला अडथळा अगदी लीलया दूर केला. या सामन्यात २ तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१,६-३, ३-६,६-१ असे पराभूत केले.

क्लान हा विश्व रँकिंगमध्ये फक्त एका स्थानाने पुढे आहे.आता पुढील फेरीत सुमीत नागलसमोर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या डॉमिनिक थीम या खेळाडूचे आव्हान असणार आहे. सुमित नागलने गेल्याच वर्षी यूएस ओपनमधून ग्रँडस्लॅमच्या विश्वात पाऊल ठेवलं होतं. ग्रँडस्लॅमच्या पदार्पणातच त्याने टेनिस सम्राट रॉजर फेडररच्या नाकी नऊ आणले होते.

सोमदेव देववर्मन याने २०१३ साली तीन ग्रॅण्डस्लॅमच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन व अमेरिकन ओपन या तीन स्पर्धांचा समावेश होता. २०१७ साली सोमदेवने निवृत्ती घेतली.