सुनील छेत्रीची जबरदस्त कामगिरी;  मेस्सीला मागे टाकत भारताच्या कर्णधाराने गाठला माईलस्टोन

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या कारकीर्दीत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. छेत्रीने केलेल्या दोन गोलच्या मदतीने भारताने 2022च्या फुटबॉल वर्ल्डकप आणि 2023च्या आशिया कप पात्रताफेरीच्या ग्रुप ई मधील दुसऱ्या फेरीतील लढतीत बांगलादेशचा 2-0ने पराभव केला. भारताच्या या विजयासह छेत्रीने अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेसीचा विक्रम मागे टाकला.

    कतार: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या कारकीर्दीत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. छेत्रीने केलेल्या दोन गोलच्या मदतीने भारताने 2022च्या फुटबॉल वर्ल्डकप आणि 2023च्या आशिया कप पात्रताफेरीच्या ग्रुप ई मधील दुसऱ्या फेरीतील लढतीत बांगलादेशचा 2-0ने पराभव केला. भारताच्या या विजयासह छेत्रीने अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेसीचा विक्रम मागे टाकला.

    छेत्रीने बांग्लादेशविरोधात सामन्यात केलेल्या दोन गोल्समुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील गोल्सची संख्या 74 झाली. ज्यामुळे छेत्री मेस्सीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मेस्सीच्या नावावर सध्या 72 गोल्स असून पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 103 गोल्ससह प्रथमस्थानी आहे. या रेकॉर्डसोबतच छेत्रीने आणखी एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे ज्याने तिन्ही दशकात देशासाठी गोल लगावले आहेत. त्याने 2004 साली भारतीय संघात पदार्पण केलं तेव्हापासून तो आतापर्यंत देशासाठी खेळत असून प्रत्येक सामन्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडतो. दरम्यान, फुटबॉलमध्ये भारत बराच पिछाडीवर आहे. भारतीयांमध्ये फुटबॉलबद्दल जास्त प्रसिद्धी नसल्याने हा खेळ अधिक खेळला जात नाही. मात्र पूर्वी भाईचूंग भूतिया आणि सध्याचा कर्णधार सुनिल छेत्री यांनी भारतीय फुटबॉलला काही प्रमाणात प्रसिद्ध नक्कीच केले आहे.

    भारतीय कर्णधार म्हणाला की, बहुधा दहा वर्षानंतर तो आपले गोल्स मोजू शकेल. मी गोलची संख्या मोजत नाही. दहा वर्षांनंतर आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मोजू. आपले गोल मोजण्याऐवजी छेत्री सोमवारी खेळलेल्या सामन्यातील उणीवा सुधारण्यावर भर देत आहे. आम्ही बऱ्याच संधी गमावल्या. आम्ही अधिक चांगले करू शकलो असतो. ही पात्रता स्पर्धा संपूर्ण चढउतारांनी भरली आहे. मागे वळून पाहिले तर असे दिसते की आम्ही यापेक्षा बरेच चांगले केले असते. आपण गोल्सबद्दलही बोलू पण, मला आनंद आहे की आम्हाला तीन गुण मिळविण्यात यश आले, असे छेत्री म्हणाला.