आयपीएल २०२०बाबत सुनील गावसकरांनी केलं महत्त्वाचं वक्तव्य

मला खात्री आहे की यंदादेखील अनेक उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेत आपला ठसा उमटवतील. सध्या सर्वच संघ युएईमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष मुंबई विरूद्ध चेन्नई या सलामीच्या सामन्याकडे आहे. मला अशा अपेक्षा आहे की या स्पर्धेतून लाखो लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल, असे महत्त्वाचे विधान सुनील गावसकर यांनी केले आहे.

आयपीएलच्या (IPL 2020) १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. सर्व संघातील खेळाडू आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधाराच्या (Captain) नेतृत्वाखाली सराव करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona Virus) क्रिकेटचे अनेक सामने रद्द करण्यात आले. परंतु यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता अनेक नियम आणि अटींसहित (Terms and Conditions)  संपूर्ण स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र, या स्पर्धेबाबत सुनील गावसकर (Sunil Gavaskar ) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

मला खात्री आहे की यंदादेखील अनेक उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेत आपला ठसा उमटवतील. सध्या सर्वच संघ युएईमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष मुंबई विरूद्ध चेन्नई या सलामीच्या सामन्याकडे आहे. मला अशा अपेक्षा आहे की या स्पर्धेतून लाखो लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल, असे महत्त्वाचे विधान सुनील गावसकर यांनी केले आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो IPLमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई संघाचे नेतृत्व धोनी गेली अनेक वर्षे केले आहे. त्याच्याबद्दलही गावसकर यांनी मत व्यक्त केले आहे.