भारत-इंग्लंड मालिका कोण जिंकणार, सुनील गावस्करांनी सांगितली भविष्यवाणी

भारत इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशा फरकाने हरवेल, अशी मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी ही भविष्यवाणी केलीये. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने प्रथम भारतीय संघ 5-0 अशा फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता गावस्करांनी भविष्यवाणी केली आहे.

    मुंबई : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये (India tour of England) पोहोचला आहे. भारताला या इंग्लंड दौऱ्यात एकूण सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका विराटसेना खेळेल.

    18 जून ते 23 जून दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडशी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन हात करेल. ही मॅच साऊथहॅम्प्टन येथे होणार आहे आणि त्यानंतर भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. तत्पूर्वी भारताचे महान खेळाडू आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केलीये.