सागर धनखड हत्येप्रकरणी सुशील कुमारचा मोठा खुलासा…

देशाला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याचे सहकारी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम लगातार सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांची चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्या विधानाबाबत क्रॉस चेक केलं जात आहे.

    नवी दिल्ली : ज्यूनियर कुस्तीपटू सागर धनखड (Sagar Dhankar Murder Case) हत्या प्रकरणात देशाला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याचे सहकारी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम लगातार सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांची चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्या विधानाबाबत क्रॉस चेक केलं जात आहे.

    एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कुस्तीपटू सुशील कुमार यांच्यावर हत्या प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. परंतु ४ मेच्या रात्री सागर धनखडचा छत्रसाल स्टेडियममध्ये मृत्यू झाला होता. मात्र, हे तिरस्काराचे युद्ध नव्हते तर सूडबुद्धीची भावना होती. घटनेच्या दिवशी कुख्यात गुंड काला जठेडीचा भाचा सोनू, रविंद्र आणि इतर काही जणांमध्ये दिल्ली मॉडल टाऊनच्या फ्टॅटवरून सुशील कुमारसोबत वाद झाला होता. यामध्ये त्या लोकांनी सुशीलच्या शर्टची कॉलर पकडली आणि तुला बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी सुद्धा दिली होती.

    अपमानामुळे सुशीलला राग अनावर

    भांडण झाल्यानंतर सुशील कुमारला आपल्या अपमानामुळे राग अनावर झाला. त्यामुळे प्रचंड राग आणि तनावात येऊन सुशीलने बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुशीलने कुख्यात नीरज बवाना आणि असौदा गिरोह यांसारख्या व्यक्तींची मदत घेतली. सुशील अवघ्या तासांतच हरियाणातील बदमाश व्यक्तींना बोलावून घेतलं आणि त्याच रात्री सोनूसोबत त्याच्या सहकारी मित्रांची बेदम मारहाण केली. याच घटनेवेळी सागरच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. त्यामुळे त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारावेळीच त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला.