सुशीलला तुरुंगात हवे प्रोटिन शेक; टोकियो ऑलिम्पिकची तयारी

सहकारी कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारने आता प्रोटिन शेक दिला जावा, अशी मागणी केली आहे. आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी प्रोटिन सप्लिमेंट, एक्सरसाइज बॅण्ड (व्यायामासाठी लागणारे पट्टे) व विशेष आहार दिला जावा, अशी सुशील कुमारने मागणी केली आहे.

    दिल्ली : सहकारी कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारने आता प्रोटिन शेक दिला जावा, अशी मागणी केली आहे. आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी प्रोटिन सप्लिमेंट, एक्सरसाइज बॅण्ड (व्यायामासाठी लागणारे पट्टे) व विशेष आहार दिला जावा, अशी सुशील कुमारने मागणी केली आहे.

    दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं मिळवलेला एकमेव भारतीय खेळाडू असणाऱ्या सुशील कुमारने आपल्या मागणीसाठी दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

    23 जानेवारी रोजी दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या कुस्तीपटू सागर धनकड यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला अटक केली होती.

    हे सुद्धा वाचा