जलतरणपटू सुयश जाधवची पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड; आमदार रोहित पवारांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा

सुयशाच्या निवडीबदल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. त्याला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याला सुयश लाभो, यासाठी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा!, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

    मुंबई: जागतिक स्तरावर दिव्यांग व्यक्तींसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा जपानमधील टोकियो येथे ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा होईल नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. येत्या २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेसाठी पात्र ठरत पॅरा जलतरणपटू सुयश जाधवने महाराष्ट्राची मान उंचावली आहे.


    सुयशाच्या निवडीबदल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. त्याला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याला सुयश लाभो, यासाठी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा!, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. सुयशला २०२० मध्ये अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

    कोरोना काळात पॅरा ऑलिम्पिकची स्पर्धा होईल, की नाही या विषयी अद्याप शशांकता आहे, मात्र भारतीय खळाडू ऑलिम्पिकसाठी पुर्ण तयार आहे. त्यामुळे आता सुयश जाधव सारख्या खेळाडूनं जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव मोठं करावं अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

    टो