आयो असा फटका मारलाय म्हणून सांगू? सोशल मीडियावर राशिद खानच्या व्हिडिओने केलाय धिंगाणा

  अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान ( Rashid Khan) याचीच शनिवारी सोशल मीडियावर चर्चा रंगली. ट्वेंटी-२० ब्लास्ट २०२१मध्ये ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या राशिदनं पहिल्याच सामन्यात धमाकेदार शॉट मारला. या सामन्यात राशिदची कामगिरी एवढी साजेशी झाली नाही, परंतु त्याच्या अतरंगी फटक्याची चर्चा जोरदार रंगली. त्यानं १३ सामन्यात २६ धावांची वादळी खेळी केली आणि त्यात ४ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. राशिदनं त्या अतरंगी शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

  राशिद खानचा हा व्हिडिओ ट्वेंटी-२० ब्लास्टनेही सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनी राशिदला विचारले की हा चेंडू तू कसा सीमापार पाठवलास?. राशिदचा हा फटका भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या हॅलिकॉप्टर शॉट्सशी मिळताजुळता आहे. त्याच्या या व्हिडिओवर एकानं कमेंट केली की, महेंद्रसिंग धोनीनं हॅलिकॉप्टर शॉट पृथ्वीवर आणला, परंतु राशिदनं त्याला मंगळ ग्रहावर पोहोचवलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vitality Blast (@vitalityblast)

  t 20 blast afghanistan spinner rashid khan plays outrageous helicopter shot vitalityblast watch video