IND vs AUS (1st T-20) Live : | कांगारूला आणखी एक मोठा झटका, संजू सॅमसनने घेतला स्मिथचा सुरेथ झेल | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट10 महीने पहले

कांगारूला आणखी एक मोठा झटका, संजू सॅमसनने घेतला स्मिथचा सुरेथ झेल

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
16:49 PMDec 04, 2020

चहलच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथची दांडी गुल

- ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा फटका बसला असून भारताने पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन केलं आहे. 

- संजू सॅमसनने घेतला स्मिथचा सुरेथ झेल

- १२ धावांची खेळी करत स्मिथ माघारी परतला

- ऑस्ट्रेलिया संघाच्या ९३ धावा पूर्ण झाल्या आहेत. तसेच दोेन गडी बाद झाले आहेत.

16:36 PMDec 04, 2020

ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फुटली

ऑस्ट्रेलिया संघाने सामन्याची सुरूवात चांगल्या प्रकारे केली होती. परंतु फलंदाज फिंचची झेल हार्दिक पांड्याने घेतली असता, फिंच सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच शॉर्ट आणि फिंच यांची जोडी फुटली आहे. त्यामुळे कांगारूला पहिला झटका टीम इंडिया कडून मिळाला आहे. 

 

 

16:30 PMDec 04, 2020

ऑस्ट्रेलियाच्या ९ ओव्हर ६८ धावा पूर्ण

- ऑस्ट्रेलिया संघाची दमदार सुरूवात, फलंदाज डार्सी शॉर्ट आणि फिंचची  शानदार फटकेबाजी

- ऑस्ट्रेलियन संघाने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

-  ऑस्ट्रेलियाच्या ८ ओव्हर पूर्ण झाल्या असता, ६० धावा पूर्ण झाल्या आहेत.

- ऑस्ट्रेलियाच्या ९ ओव्हरमध्ये ६८ धावा पूर्ण

15:51 PMDec 04, 2020

टीम इंडियाची १६१ धावांपर्यंत मजल

- टीम इंडियाच्या १६१ धावा पूर्ण झाल्या असून ७ गडी बाद झाले आहेत.

-  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान दिलं आहे. 

- ऑलराऊंडर रविंद्र जाडेजानी उत्कृष्ट खेळी केली असता ४४ धावांवर मजल मारली आहे. तसेच तोे नाबाद झाला आहे. 

15:43 PMDec 04, 2020

लोकेश राहुलने झळकावलं अर्धशतक

- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामन्याला सुरूवात झाली असून ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- टीम इंडियाच्या फलंदाजीसाठी सलामीवीर शिखर धवन मैदानात उतरला होता. परंतु मिचेल स्टार्कने शिखर धवनचा त्रिफळा उडवला आहे. तसेच  ६ चेंडूत अवघी १ धाव काढत धवन माघारी फिरला आहे. त्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला असता, कोहलीने ९ चेंडूत ९ धावा करत भारतीय कर्णधार माघारी परतला आहे.

 

- ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंवर लोकेश राहुलने शानदार फटकेबाजी केली असता, भारतीय संघाने ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. तसेच राहुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं आहे.

- संजू सॅमसन , मनिष पांडे, हार्दीक पांड्या हे सुद्धा माघारी परतले आहेत.

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) संघात आजपासून टी-२० मालिकेला (T20 series) सुरूवात झाली आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (ODI) भारताने एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाकडे आजपासून सुरु होणाऱ्या मालिकेत यजमान संघाविरुद्ध बदला घेण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकदिवसीय विजयाची लय मिळवल्यानंतर त्याचा संघ टी-२० मालिकेसाठी मैदानावर उतरेल. आतापर्यंत दोन्ही संघांमधील टी -२० सामन्यांच्या संघर्षाची दखल घेतल्यास यजमान संघावर भारतीय संघाचे वर्चस्व असल्याचे दिसुन येत आहे. असे मालिकेच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया आजवर २० वेळा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आमने-सामने आले आहेत. त्यापैकी भारताने एकूण ११ सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलिया ८ वेळा जिंकला आहे. भारतीय संघाला टी-२० साठी सध्या बरीच संतुलित दिसत आहे. मागील न्यूझीलंड दौऱ्यावर भारताने किवी संघाचा ५ वेळा टी-२० मॅचच्या मालिकेत दारुण पराभव केला होता.

उभय संघ खालीलप्रमाणे

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्ड्सन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, आर्सी शॉर्ट, अ‍ॅडम झम्पा.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२४ शुक्रवार
शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

राजकीय पक्षांची 'हायकमांड संस्कृती' ही पक्षांनाच मारक ठरते आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.