टी 20 वर्ल्ड कप; कोणत्या खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर खेळविल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीनंतरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. 7 सप्टेंबरला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होईल, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर कोणत्याही खेळाडूला टी-20 विश्वचषकाचं तिकीट मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. निवड समिती आणि टीम इंडिया व्यवस्थापनाने आधीच खेळाडूंची निवड केली आहे.

    दिल्ली : आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत कोणत्या खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ओमान आणि यूएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होईल.

    भारत आणि इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर खेळविल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीनंतरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. 7 सप्टेंबरला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होईल, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर कोणत्याही खेळाडूला टी-20 विश्वचषकाचं तिकीट मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. निवड समिती आणि टीम इंडिया व्यवस्थापनाने आधीच खेळाडूंची निवड केली आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी एकूण 15 खेळाडूंची निवड करणार आहे. याशिवाय 3 राखीव खेळाडूंनाही ताफ्यात दाखल करण्यात येईल. ईशान किशन, पृथ्वी शॉ आणि एक फिरकीपटू राखीव खेळाडू म्हणून यूएईला जाणार आहेत. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांना टी-20 विश्वचषक संघात संधी मिळू शकते. आर अश्विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणत्याही दोन फिरकीपटूंची निवड शक्य आहे.