टी-20 वर्डकप 2021 साठी ऑस्ट्रेलियाची टीम रेडी, खेळाडूंची निवड पुर्ण, पाहा कुणाला एंट्री आणि कुणाला डच्चू

स्मिथ आणि फिंच तंदुरुस्त असल्याने ऑस्ट्रेलियन संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोपराच्या दुखापतीमुळे स्मिथला वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्याला मुकावे लागले होते. एवढेच नाही तर, अॅशेस मालिका पाहता स्टीव्ह स्मिथ टी -20 विश्वचषकातून बाहेर पडेल अशी अटकळ होती. पण आता स्मिथ परतल्याने सर्व प्रश्न संपले आहेत.

  ऑस्ट्रेलियाने यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. एरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ टी -20 विश्वचषकात भाग घेईल. दुसरीकडे, स्मिथ, वॉर्नर, कमिन्स, मॅक्सवेल आणि स्टोइनिस सारखी मोठी नावे टीममध्ये परतली आहेत.

  स्मिथ आणि फिंच तंदुरुस्त असल्याने ऑस्ट्रेलियन संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोपराच्या दुखापतीमुळे स्मिथला वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्याला मुकावे लागले होते. एवढेच नाही तर, अॅशेस मालिका पाहता स्टीव्ह स्मिथ टी -20 विश्वचषकातून बाहेर पडेल अशी अटकळ होती. पण आता स्मिथ परतल्याने सर्व प्रश्न संपले आहेत.

  फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचला. पण टी -20 मालिकेदरम्यान फिंचच्या गुडघ्याला दुखापत झाली. आरोन फिंच आता पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला पुन्हा एकदा संघाची कमान देण्यात आली आहे.

  मॅक्सवेल, कमिन्स, स्टोइनिस आणि वॉर्नर सारख्या मोठ्या खेळाडूंनी बायो बबलचा हवाला देत वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवले होते. या चार खेळाडूंना टी -20 विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. पॅट कमिन्सला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

  अशी आहे टीम ऑस्ट्रेलिया

  एरॉन फिंच (कर्णधार), एगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्नस स्टोइनिस, स्वॅम्पसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा.