कोरोनाच्या काळातच टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामने होणाची शक्यता, ‘या’ दिवशी होणार पहिला सामना

इंग्लंड विरूद्ध पहिला सामना हा ४ ऑगस्ट रोजी टीम इंडियाला नॉटिंघम या शहरात खेळावा लागणार आहे. पहिल्या सामन्याची सुरूवात नॉटिंघम शहरात होईल. तर शेवटची मालिका ही १० सप्टेंबर रोजी मॅंचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. 

  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ कसोटी सामने खेळवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना सुद्धा एन्ट्री दिली जाऊ शकते. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी कोरोनावरील बंदी उठवण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या सामन्याची सुरूवात ४ ऑगस्टपासून होण्याची शक्यता आहे.

  इंग्लंड विरूद्ध पहिला सामना हा ४ ऑगस्ट रोजी टीम इंडियाला नॉटिंघम या शहरात खेळावा लागणार आहे. पहिल्या सामन्याची सुरूवात नॉटिंघम शहरात होईल. तर शेवटची मालिका ही १० सप्टेंबर रोजी मॅंचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.

  इंग्लंडमध्ये कोरोनाचे प्रतिबंध उठण्याची शक्यता

  बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी १९ जुलै पर्यंत इंग्लंडमधील कोरोना प्रतिबंध पूर्ण पणे उठवण्यात येईल. असं वक्तव्य केलं होतं. तसेच कोरोना विषाणूसोबत जगण्याचा नवीन उपाय आपल्याला शोधावा लागणार आहे. असं त्यांनी सांगितलं होतं. आपल्याला माहितीये की, कोरोनाचं संकट १९ जुलैला संपणार नाहीये. परंतु आम्ही आता लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची संधी देत आहोत.

  WTC च्या अंतिम सामन्यात ४ हजार चाहत्यांना मिळाली एन्ट्री 

  टीम आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअन शीपचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. यामध्ये ४ हजार क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात आली होती. परंतु अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला होता. तसेच अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता.