टीम इंडियाकडून श्रीलंकेला २२६ धावांचे आव्हान, कोणता संघ बाजी मारणार?

सलामीवीर पृथ्वी शॉ, संजू सॅमसन आणि मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने दिलेल्या योगदानामुळे टीम इंडियाला दोनशेपार जाता आले. श्रीलंका संघाला व्हाईट वॉश देण्याचा टीम इंडिया प्रयत्न करत आहे. तर  श्रीलंका संघ सुद्धा आजचा सामना जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहे.

    टीम इंडियासमोर तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने दमदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला आहे. कोलंबोच्या आर. टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज सहा खेळाडूंची अदलाबदल केलेली टीम इंडिया ४३.१ षटकात  २२५ धावांवर आटोपली.

    सलामीवीर पृथ्वी शॉ, संजू सॅमसन आणि मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने दिलेल्या योगदानामुळे टीम इंडियाला दोनशेपार जाता आले. श्रीलंका संघाला व्हाईट वॉश देण्याचा टीम इंडिया प्रयत्न करत आहे. तर  श्रीलंका संघ सुद्धा आजचा सामना जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहे.

    श्रीलंकेचे गोलंदाज प्रवीण जयविकरामा आणि अकिला धनंजय यांनी ३-३ विकेट घेतले. तर दुष्मंथ चमीरा आणि दासुन शनाकाला १-१ विकेट घेण्यास यश मिळाले आहे. सामना सुरू असताना मध्येच पाऊस पडल्यामुळे सामना दीड तास थांबवण्यात आला होता. परंतु त्यानंतर टीम इंडियाने ३८ धावांच्या आतच ५ गडी स्वस्तात बाद झाले. यामध्ये मनीष पांडे, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गौतम आणि नितीश राणा यांसारखे खेळाडू स्वस्तात बाद झाले.