टी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय

टी-20 वर्ल्डकप नंतर रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडून आणखीन काही महिन्यांसाठी करार वाढवण्यात येण्याच्या प्रस्तावाला नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नवीन आणि पुढील प्रशिक्षकासाठी अर्ज करण्यात येऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

    भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 वर्ल्डकप नंतर राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर टीमसोबत रवी शास्त्रीसहित अन्य कोचिंग स्टाफ देखील नसणार असल्याचं सांगितलं जात आहे. टी-20 वर्ल्डकप नंतर शास्त्री यांचा करार संपणार आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) च्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत करार वाढवण्याच्या प्रस्तावाला नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर यावेळी टीम इंडियासोबत नवीन प्रशिक्षक असणार आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 वर्ल्डकप नंतर रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडून आणखीन काही महिन्यांसाठी करार वाढवण्यात येण्याच्या प्रस्तावाला नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नवीन आणि पुढील प्रशिक्षकासाठी अर्ज करण्यात येऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    राहुल द्रविड प्रशिक्षक होण्याची शक्यता कमी

    राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख पद सांभाळत आहे, त्यामुळे ते टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार नाही, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, त्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संपर्क करण्यात आला आहे की नाही. या संदर्भातील माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

    रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक

    रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्यांचा करार 2019 मध्ये वाढवण्यात आला होता, जो आता टी-२० विश्वचषकानंतर संपत आहे. रवी शास्त्री आणि विराट यांच्यामध्ये टीम इंडियाने कसोटीत परदेशी भूमीवर शानदार कामगिरी केली आहे.