टीम इंडियाने कांगारूला लोळवले, रिषभ पंत ठरला विजयाचा शिल्पकार

भारतीय संघाने गावस्कर-बॉर्डर ट्रॅाफी २-१ अशी मिळवली असून ३ गडी राखत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना आज ( मंगळवार ) रंगायतदार होता. भारतीय संघाने गावस्कर-बॉर्डर ट्रॅाफी २-१ अशी मिळवली असून ३ गडी राखत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

भारताचे वेगवान फलंदाज शुभमन गिल आणि रिषभ पंत यांच्या जिगरबाज खेळीने भारताने हा विजय साकारला आहे. तर रिषभ पंत ८९ धावांवर नाबाद असून विजयाचा शिल्पकार ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने ३२९ धावा करून ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे.