टीम इंडियाने सामना गमावला, पण हार्दिक पांड्याच्या एका शॉर्टने चाहत्यांची जिंकली मनं ; ICCने देखील केलं कौतुक

टीम इंडियाच्या पराभवापेक्षा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या एका शॉर्टनी चाहत्यांची मने जिंकली आहे. पहिला टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आला.

    अहमदाबाद : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-२० सामना सुरू आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. परंतु टीम इंडियाच्या पराभवापेक्षा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या एका शॉर्टनी चाहत्यांची मने जिंकली आहे. पहिला टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आला.

    कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंड संघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यांत भारतीय संघाने नाणेफेक गमावली. इंग्लडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केल. सलामीवीर रोहितच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्यापुढं कोलमडली.

    श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये १२४ धावा केल्या. यामध्ये हार्दीक पांड्याची त्याला साथ मिळाली. या विजयासह पाहूण्या संघाने पाच सामन्याच्या मालिकेत १-० असी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना उद्या १४ मार्च रोजी होणार आहे.