Team India ready for final round of quarantine Test championship with only 3 days stay in England nrms | इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवस राहावं लागणार क्वारंटाईन, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया तयार | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
क्रीडा
Published: May 23, 2021 08:30 AM

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी!इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवस राहावं लागणार क्वारंटाईन, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया तयार

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवस राहावं लागणार क्वारंटाईन, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया तयार

WTC ची अंतिम फेरी १८ जूनला खेळवली जाणार आहे. भारतीय पुरूष आणि महिला अशा दोन टीम दोन जूनला इंग्लंडला रवाना होणार आहेत. याअगोदर टीम १९ मेपासून दोन आठवड्यांसाठी मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे.

  इंग्लंडच्या दौऱ्याआधीच टीम इंडियासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.  इंग्लिश क्रिकेट बोर्डने बीसीसीआयला फक्त ३ दिवसांसाठी टीम इंडियाला क्वारंटाईन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता विराट सेनेला इंग्लंडमध्ये फक्त ३ दिवसांसाठी क्वारंटाईन ह्वावं लागणार आहे. टीम इंडिया पुढच्या महिन्यातील २ जूनला रवाना होणार आहे.

  त्याचसोबतच न्यूझिलंडच्या विरूद्ध वर्ड टेस्ट चॅम्पिअनशिप खेळण्यासाठी टीम इंंडियाला सरावासाठी सलग १२ दिवसांची संधी मिळणार आहे. पहिल्यांदा इंग्लिश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला १० दिवस क्वारंटाईन करणार असल्याची माहिती दिली होती. तसेच तो १० दिवस म्हणजेच १२ जूनला संपला असता आणि खेळाडूंना सराव करण्यासाठी फक्त सहाच दिवस मिळाले असते. परंतु इंग्लिश क्रिकेट बोर्डाने या नियमात बदल केले असून फक्त तीन दिवसांसाठी क्वाइंटाईन करण्यार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  WTC ची अंतिम फेरी १८ जूनला खेळवली जाणार आहे. भारतीय पुरूष आणि महिला अशा दोन टीम दोन जूनला इंग्लंडला रवाना होणार आहेत. याअगोदर टीम १९ मेपासून दोन आठवड्यांसाठी मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे.

  परंतु मुंबईच्या मैदानावर सराव करण्यासाठी बीसीसीआयने अजूनही मान्यता दिलेली नाहीये. वेळोवेळी सगळ्यांची टेस्टिंग केली जाणार आहे. बोर्डाने असं देखिल सांगितलं आहे की, दौऱ्याअगोदर जो खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येईल, त्याला टीममधून बाहेर केलं जाणार आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १८ शुक्रवार
  शुक्रवार, जून १८, २०२१

  कोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.