जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर ‘महासामना’, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार

या स्टेडियमचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये २ ड्रेसिंग रूम असतात. पण मोटेरामध्ये तब्बल ४ ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण ५५ क्लबहाऊस आहेत. त्यात ३ सरावासाठीची मैदानं आणि ५० खोल्यांचा समावेश आहे.

    अहमदाबाद : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा कसोटी सामना होणार आहे. हा फक्त सामना नसून महासामना असणार आहे. कारण जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर करण्यात आलं आहे. तसेच हा सामना डे-नाईट असणार असून गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आलं आहे.

    या स्टेडियमचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये २ ड्रेसिंग रूम असतात. पण मोटेरामध्ये तब्बल ४ ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण ५५ क्लबहाऊस आहेत. त्यात ३ सरावासाठीची मैदानं आणि ५० खोल्यांचा समावेश आहे.

    टीम इंडिया आपल्या संघातून २ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतात. यामध्ये फिरकीपटू अश्निव आणि अक्षर पटेल धडाकेबाज गोलंदाजीसाठी तयारीत राहू शकतात. तर वेगवान गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या तिघांपैकी एकाची निवड आणि संघात वापसी होऊ शकते.

    नेटमध्ये पिंक चेंडूने पंड्याने केला सराव

    बुमराहने या सीरीजची पहिली कसोटी खेळली आहे. दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजला त्याच्या जागेवर खेळवण्यात आलं होतं. तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजच्या जागेवर बुमराह संघात कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु दुखापत झाल्यामुळे बाहेर असलेला ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने नेटमध्ये पिंक चेंडूने सराव केला होता. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये बुमराहच्या बदल्यात हार्दिक पांड्याला संघात घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवली जात आहे.