जुलै महिन्यात टीम इंडिया करणार श्रीलंका दौरा ; राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणार असला तरी तो विद्यमान कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची जागा घेणार नाही. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये 'संपूर्ण नवी टीम इंडिया' श्रीलंकेला जाणार आहे. या टीमचा कॅप्टन अजूनही नक्की नाही.

    मुंबई :  टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) लवकरच टीम इंडियाचा (Team India) कोच होणार आहे. राहुल द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.

    राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणार असला तरी तो विद्यमान कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची जागा घेणार नाही. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे.  प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये ‘संपूर्ण नवी टीम इंडिया’ श्रीलंकेला जाणार आहे. या टीमचा कॅप्टन अजूनही नक्की नाही. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस अय्यर ही चार नाव कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. मात्र टीमचा कोच राहुल द्रविड असेल, असं बीसीसीआनं निश्चित केल्याची माहिती ANI नं बीसीसीआयच्या सुत्रांच्या आधारे दिली आहे.