टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज अटीतटीचा सामना, दोन्ही संघाची २-२ अशी आघाडी; शेवटच्या सामन्यात कोण बाजी मारणार ?

हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. आतापर्यंत मालिकेत ४ सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. यामुळे मालिकेत बरोबरी झाली असता, आज टीम इंडिया चांगली कामगिरी करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अहमदाबाद : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज (शनिवार) खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. आतापर्यंत मालिकेत ४ सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. यामुळे मालिकेत बरोबरी झाली असता, आज टीम इंडिया चांगली कामगिरी करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    मालिकेतील हा पाचवा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. पण जिंकणार एकच संघ. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

    दरम्यान, गुरुवारी झालेल्या चौथ्या मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा ८ रननं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेली ही मॅच भारताने जिंकली आणि मालिकेत बरोबरी साधली. सूर्यकुमार यादवचं अर्धशतक हे भारताच्या बॅटींगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. सूर्यकुमारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटींग करताना २८ बॉलमध्येच अर्धशतक झळकावले होते. तर रोहित, राहुल आणि विराट हे प्रमुख बॅट्समन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट आणि रोहित पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक करणार का? हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.