कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत

भारतीय खेळाडू ही जर्सी परिधान करुन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाची नवी जर्सी स्वेटरप्रमाणे असल्याचे दिसत आहे. यावर एका बाजूला निळ्या रंगामध्ये बीसीसीआयचा लोगो; तर दुसऱ्या बाजूला आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद अंतिम सामना २०२१ असे लिहिलेले आहे.

    जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण भरणार आहे. तिथे त्यांना सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. त्यानंतर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तत्पुर्वी अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.

    इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापुर्वी भारतीय संघाचे सर्व खेळाडू मुंबईत एकत्र जमले आहेत. तिथे त्यांना विगलीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी (२९ मे) जडेजाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे.

    याबरोबरच भारतीय खेळाडू ही जर्सी परिधान करुन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाची नवी जर्सी स्वेटरप्रमाणे असल्याचे दिसत आहे. यावर एका बाजूला निळ्या रंगामध्ये बीसीसीआयचा लोगो; तर दुसऱ्या बाजूला आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद अंतिम सामना २०२१ असे लिहिलेले आहे.