Team India will be seen in a new jersey in the Test Championship final nrms | कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
क्रीडा
Published: May 30, 2021 08:00 AM

Test Championship कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस

भारतीय खेळाडू ही जर्सी परिधान करुन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाची नवी जर्सी स्वेटरप्रमाणे असल्याचे दिसत आहे. यावर एका बाजूला निळ्या रंगामध्ये बीसीसीआयचा लोगो; तर दुसऱ्या बाजूला आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद अंतिम सामना २०२१ असे लिहिलेले आहे.

  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण भरणार आहे. तिथे त्यांना सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. त्यानंतर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तत्पुर्वी अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.

  इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापुर्वी भारतीय संघाचे सर्व खेळाडू मुंबईत एकत्र जमले आहेत. तिथे त्यांना विगलीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी (२९ मे) जडेजाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे.

  याबरोबरच भारतीय खेळाडू ही जर्सी परिधान करुन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाची नवी जर्सी स्वेटरप्रमाणे असल्याचे दिसत आहे. यावर एका बाजूला निळ्या रंगामध्ये बीसीसीआयचा लोगो; तर दुसऱ्या बाजूला आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद अंतिम सामना २०२१ असे लिहिलेले आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २४ गुरुवार
  गुरुवार, जून २४, २०२१

  आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.