कांगारूला दणका दिल्यानंतर टीम इंडियाला मिळणार मोठं गिफ्ट, बीसीसीआयचा आनंद गगनात मावेना

टीम इंडियाच्या या कामगिरीवर बीसीसीआय चांगलीच खूश झाली आहे. या ऐतिहासिक विजयाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे.

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी २-१ अशी मिळवली आहे. वेगवान फलंदाज चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे. सलग दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत लोळवलं आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआय भारतीय संघाला मोठं गिफ्ट देणार आहे.

बीसीसीआयचा आनंद गगनात मावेना

टीम इंडियाच्या या कामगिरीवर बीसीसीआय चांगलीच खूश झाली आहे. या ऐतिहासिक विजयाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, यंदाच्या वेळची कामगिरी खास म्हणावी लागेल, कारण विराट कोहलीची अनुपस्थिती, भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि कोरोना लॉकडाऊनमुळे बायो-बबलमध्ये राहणं, या सगळ्या अडचणींवर मात करत भारताने हा इतिहास घडवला.